![]() |
गुरुवर्या डॉ. मंजिरी देव: विविध भावमुद्रा
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ |
बाई, गतजन्मींची पुण्याई असते यावर विश्वास ठेवायलाच हवा, नाहीतर माझ्यासारख्यांना आपण गुरू म्हणून लाभायचे दुसरे काय कारण असणार....!!!
परिसाला सुवर्ण तयार करण्यासाठी लोखंडाची तरी गरज लागते....आपण आमच्यासारख्या दगडांना सुवर्णस्पर्श केलात.....!!!
शत शत प्रणाम ....
गुरुवर्या डॉ. मंजिरी देव: परिचय:
कथकमधील एक ज्येष्ठ व्यासंगी नाव. पद्मश्री नटराज गोपीकृष्णांच्या कथक परंपरेला पुढे नेणाऱ्या त्यांच्या आघाडीच्या शिष्यांपैकी एक म्हणजे डॉ. मंजिरी देव. कथक व संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सम्मानित बाईंच्या अनेकानेक शिष्या आज भारतात आणि भारताबाहेरही कथक परंपरेचा प्रसार करत आहेत.
डॉ. मंजिरी देव: ग्रंथ रचना:
- ओळख कत्थकची (मराठी, इंग्रजी तसेच हिंदीमध्ये)
- नृत्यसौरभ : विशारद पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक
- कत्थक कौमुदी: पदव्युत्तर, अलंकार इ. परीक्षांसाठी मार्गदर्शक
- कत्थक नृत्य में कवित्त छंद : कथकच्या कवित्त परंपरेचा अद्भुत संग्रह
No comments:
Post a Comment