Monday, February 17, 2020

Deconstructing Ashtapadi

Radha, Krishna and Sakhi, Kangra style painting based on Geet Govind.
Government Museum, Chandigarh

Abhinaya in Kathak is majorly presented in the framework of various genres of classical as well as some semi-classical genres of songs and poetry. This framework of the composition enables the dancer to blend the nuances of expressions with enrapture of rhythm. While Thumri rules the emotive expression in Kathak;  many other genres of Geeti are presented in Kathak too. These include devotional genres like bhajans and stotras, as well as some semi-classical genres like Chaiti, Kajri, Hori and so on. This list remains incomprehensive unless rare genres such as Dhrupad, Chaturang and Ashtapadi are also acknowledged.
Ashtapadi is rarely found within Kathak performances today. However this genre plays an important role to train Kathak dancers, especially to imbibe Abhinaya. This owes to the content of the Ashtapadis and the length of eight stanzas, both being a challenge for dancers. This article investigates the following:

1. Ashtapadi as a genre: Origin and development
2. Astapadi in Kathak
3. Can we label any song with eight stanzas as Ashtapadi?

1. The genre Ashtapadi: Origin and development
The literal meaning of the word Ashtapadi is a song with eight stanzas, however, any song whatsoever with mere eight stanzas cannot be labelled as Ashtapadi. The term Ashtapadi is prevalent from Jayadeva’s Geetgovind. Many compositions with eight stanzas existed within the Vedas and Puranas but were never termed as Ashtapadi in the tradition before and after Jayadeva.
Jayadeva, the ‘Shringar-Saraswat’ as he has titled himself in his work, has pioneered the genre Ashtapadi in the mainstream literature in his iconic work Geetgovind. The songs in Geetgovind are known as Ashtapadis in the literary as well as in the musical tradition. Although, Jayadev himself does not use the name Ashtapadi, he calls them Prabandhas. The word Prabandha is a common term used in Carnatic music with the general meaning of ‘a composition’. Jayadeva dropped the typical formats as well as metres of established Sanskrit Literature and instead used the format and metres, then popular in Prakrit languages, especially Apabhramsha. It is a possibility that this particular genre named Ashtapadi (amorous poetry of eight stanzas) was popular in Prakrit literature of the era that Jayadev adopted in Sanskrit. Someshwara talks about a poetry form called Charya-geet of the Buddhist poet Siddhacharya in his rhetoric work Manasollas. They resemble the Ashtapadi’s. Hence, we can conclude that similar Ashtapadi compositions were already popular in Prakrit literature and Jayadeva may be the first one to experiment them in Sanskrit.
Indian. <em>Krishna Gazes Longingly at Radha, Page from the "Lumbagraon Gita Govinda" Series</em>, ca. 1820-1825. Opaque watercolor and gold on paper, sheet: 11 1/8 x 14 3/8 in.  (28.3 x 36.5 cm). Brooklyn Museum, Designated Purchase Fund, 72.43 (Photo: Brooklyn Museum, 72.43_IMLS_SL2.jpg)
Sakhi playing the role of messenger between Radha and Krishna

(Lumbagraon Gita Govinda" Series, Brooklyn Museum)

Geetgovind is the amorous poetry of Radha and Krishna’s divine love. The story unfolds with the three characters namely Krishna, Radha, and Sakhi. These ballads of love comprehend all the shades of Shringara and all the stories of Ashtanayikas. As the name suggests, Geet-Govind has ‘Geeta’, the songs with melody and these are not mere verses for recitation. These songs are composed in their specific raag and taal within their framework. Jayadeva himself used to sing these ballads of love and his wife Padmavati used to present them in dance. Hence, we can infer that these songs were composed with the purpose of musical and dance presentation.
After Jayadeva, the word Ashtapadi was particularly used for the songs from Geetgovind. Today, almost all the styles of classical dance present this form called Ashtapadi. These Ashtapadi’s are major part of Abhinaya in Odissi. Although, they present Ashtapadis composed by Jayadeva himself. The Odissi style uses many other songs from Oriya language, such as the songs penned by Oriya poet Kavisurya composed on the lines of Geetgovind. However, they are not termed as Ashtapadis in the performance. Jayadeva’s compositions are performed and are known as Ashtapadi’s.
After Jayadeva’s Ashtapadis were widely recognized and popularised, many compositions were composed on a similar line. Poet Raamapani composed Geet-Raamam where he has composed Ashtapadis centering lord Rama. Mahakavi Vidyapati Thakur was a Maithili poet who was then known as Abhinava Jayadeva since he composed Geetgovind-like pada’s in Sanskrit and in Maithili. Chaitanya Mahaprabhu was attracted to Geetgovind, after reading Maithili Ashtapadis of Vidyapati. Gujarati poet Narsi Mehta wrote Shringar Mala. In the eighteenth century, Swami Narayan Teerth composed Krishna-Leela-tarangini following the format of Geetgovind. However, all these poets while composing Ashtapadi or similar poetry format have acknowledged that they are following the tradition of Jayadeva.
The Ashtapadis of Jayadeva are extensively prevalent in southern India. This genre went on to become a type of Prabandha (composition) in Carnatic music and also became an inevitable part of some rituals. Even a particular dance-drama style stemmed from Ashtapadis and was named as Ashtapadi-attam. One more dance-drama called as Krishna-natta, is based on Ashtapadis composed by the poet Shree Manaveda, in which Ashtapadis are presented in eight parts on eight nights. Dancers are taking efforts to rejuvenate both these rare styles. The video below shows the rejuvenated, refurbished form of Ashtapadi-attam, which has characters of Radha and Krishna, also Jayadeva himself and his wife are seen as characters denoting the how synonymous Ashtapadi is with Jayadeva.



Ashtapadi had found a prominent place in Hindustani Vocal music till the beginning of the 20th century in the Gwalior Gharana. Bade Balkrishna buva began to present the verses of Ashtapadi in the format similar to
Chhota Khyal as the closing part of the main Khyal performance. He was followed by many artists from his Gharana and many Ashtapadis of Jayadeva were presented as a bandish. However, it is noteworthy that only Ashtapadis of Jayadeva were used by them in the tradition of Gwalior gharana.
Thus, Ashtapadi is not a general term for any song with eight stanzas but Ashtapadi in itself is a tradition commencing from Jayadeva, extended over centuries in music, dance, literature and even painting.

Ashtapadi as performed in Kathak:    
We cannot trace the historic timeline of Ashtpadi being encompassed in the Abhinaya literature of Kathak or when Kathak dancers incorporated this genre in the performance. Kathak dancers today present many Ashtapadis from Geet-govind. Chandan charchit neel kalevar and Lalit lavang lata are the two Ashtapadis popularly presented in Kathak. Today Kathakars mainly perform the Ashtapadi penned by the doyen Kathak legend and poet Bindadin Maharaj, Niratat Dhang. This same composition is presented as a general song or bhajan in some Kathak traditions where they do not particularly name this as an Ashtapadi. Hence, one cannot conclusively claim if this song was originally composed as an Ashtapadi or was later named as one due to adherence to the format of Ashtapadi. Nevertheless, this composition does have many specifications of Ashtapadi. This has eight stanzas in the same metre that describe the ancient form of Rasleela-Kathak, the divine dance of Krishna-Radha and gopis, and through this, describe the various aspects of Kathak style. The sthayi ‘Niratat dhang’ is repeated after every stanza, denoting that the theme of graceful romantic dance as stated in the words ‘niratat dhang’ is extended in every stanza in the romance of Krishna, in the description of Radha and in the charming dance of gopis. One more Ashtapadi composition is famous in the Kathak dancers specially belonging to the Jaipur Gharana. This composition Nand nandan nachat sudhang is accredited to Sant Surdas. The theme of this composition is as per Ashtapadi norms but only two stanzas are known and performed. It is interesting to note that this composition accredited to Surdas is famous in Kathak, but this composition does not have any reference in the Hindi literature and Surdas literature. 

Ashtapadi and Ashtaka:
Can we label any song with eight stanzas as Ashtapadi?
Often Kathakars and Kathak students are confused with these two different poetry forms namely Ashtapadi and Ashtaka. Ashtaka is the name for the Stotra with eight stanzas. Ashtakas are more ancient than Ashtapadis. An Ashtaka praises the deity in eight stanzas of the same meter. There are similar sub-categories in Stotra literature with different numbers of stanzas such as Shatak for six, Ekadash for eleven etc.
The Khand Kavya or Laghu Kavya is divided into two sub-types namely emotive and devotional. Ashtapadi belongs to the emotive category and Ashtaka belongs to the devotional category.
(Of course, the first Ashtapadi of Jayadeva, Jay Jagdish Hare can be considered as an exception, since the particular composition is the opening song and hence it is devotional as per the tradition). Technically Ashtapadi can be called Dwi-dhatu-prabandh. Dwi-dhatu has one Pallavi and many charanas or one sthayi and many antaras. Also, a part of Sthayi repeats after every antara. Ashtaka may or may not have this repetition.
Antyanupras, the rhyme at the end of the line is transpires in Ashtapadi but no such rule exists for an Ashtaka. Basically, Ashtapadi is a song genre composed for melodious singing as Ashtaka is a type of stotra created for recitation.
Thus, Ashtaka and Ashtapadi are two different forms and Shree-krishnashtak, MAdhurashtak cannot be incorporated under the form of Ashtapadi, neither any general eight stanza song can be called as Ashtapadi. In fact, Jayadev himself does not stick to the number eight. Some Ashtapadis in Geetgovind have stanzas more than or less than eight. Even the further Ashtapadi compositions have not strictly followed the stanza number as eight. The Ashtapadi was prevalent in the vocal tradition of Gwalior Gharana. Even there, the artists considered the sthayi and one antara of Ashtapadi as a small bandish and developed it like Chhota Khyal. Thus even this tradition did not stress or impose upon the number of stanzas being eight. To summarise, a song with eight stanzas is a highly generic definition of Ashtapadi. Ashtapadi is a definite tradition and the songs in this or following this tradition can be called as Ashtapadi.
Analyzing the Ashtapadi as reflected and presented in Kathak, we can sum up the following characteristics that are specific to an Ashtapadi:
1.  Ashtapadi should be composed by Jayadeva or should be one following his tradition.
2.  The song has eight stanzas and a portion of Sthayi is repeated after every stanza. This repeated portion of sthayi denotes the theme of Ashtapadi that is further developed in stanzas.
3.  The subject matter revolves around Shringar or Madhura Bhakti. The song has a theme of a particular storyline or event. The song is not about general praise or description.
Currently, Ashtapadi is studied in theory than practiced in actual performances. The mammoth length of eight stanzas may be the reason that limits its potential to appeal to the audience. Since we have proven that the numeric factor of the number  ‘eight’ in the context of Ashtapadi is insignificant, Kathakars can choose two to three stanzas as per the theme of Ashtapadi and can work out a smaller presentation suitable for the viewer. Ashtapadi can also be utilized in innovative ways to make it a different genre in the Abhinaya of Kathak.
The charming romance of Radha and Krishna in the Ashtapadis is in line with the flavor of other compositions of Kathak. Hence an Ashtapadi can be further enhanced by adding relevant Kavitta-chhandas as well as suitable Gatnikas and sometimes, small Gatbhavs. Even a small stanza of Ashtapadi can be added at the beginning of an extensive thumri like the Shayari introduces Gazal in the beginning.
The path of rejuvenation of Kathak from the stagnancy of blind rigidity of tradition is two-fold. Firstly, we can experiment novel unseen ideas and secondly, we can refurbish the older concepts in the manner that it adapts the freshness of modernity on one hand and adheres to the traditional framework on the other. Presenting Ashtapadi in an innovative manner can be a good example of the second.

Tuesday, February 4, 2020

अष्टपदी – कथकमधील अभिनयाची अनवट वाट

राधा, कृष्ण आणि सखी, गीतगोविंदावर आधारित कांगडा शैलीतील चित्र
(शासकीय वस्तुसंग्रहालय, चंदिगड)
कथकच्या अभिनय अंगात प्रामुख्याने गीताधारित नृत्यरचना सादर केल्या जातात. यात नर्तक एकाच वेळी  अभिनय आणि ताल-लयीचे सौंदर्य यांचा उत्तम मेळ सादर करू शकतो. कथकच्या भावांगावर ठुमरीचे अधिराज्य असले तरी याखेरीजही अनेक शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गीतीप्रकार कथकमध्ये सादर केले जातात. अनेक संतकवींची भजने, स्तोत्रे, उपशास्त्रीय प्रकार जसे चैती, होरी, त्याचबरोबर गायनाच्या प्रभावामुळे तसेच इतर नृत्यशैलींच्या प्रभावामुळे प्रचलित झालेले काही प्रकार सादर केले जातात जसे ध्रुपद, चतुरंग, अष्टपदी इ.

अष्टपदी कथक नृत्याच्या सादरीकरणात तशी क्वचितच सादर केली जाते, परंतु, अष्टपदीचा आठ पदांचा विस्तार आणि विषयवस्तु यामुळे कथक नृत्य अध्ययनात, विशेष करून अभिनयात प्रगल्भता यावी म्हणून अष्टपदी वरील नृत्याचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. प्रस्तुत लेखात अष्टपदी आणि कथकच्या अनुषंगाने पुढील मुद्द्यांचा विचार करणार आहोत:

1. अष्टपदी गीती-प्रकार: उगम आणि प्रसार
2. कथकमधील अष्टपदी
3. कोणत्याही आठ पदांच्या रचनेला अष्टपदी म्हणता येईल का?

1. अष्टपदी गीतीप्रकार: उगम आणि प्रसार

अष्टपदी याचा शब्दार्थ आठ पदांचे गीत असा होतो, मात्र केवळ शब्दार्थावरून कोणत्याही आठ पदांच्या रचनेला अष्टपदी या प्रकारात मोडता येणार नाही. अष्टपदी ही संज्ञा ज्ञात आणि प्रचलित झालेली दिसते ती जयदेवाच्या गीतगोविंदापासून. आठ पदे असलेल्या अनेक रचना वेद व पुराणांपासून, अष्टकादि स्तोत्रांपर्यंत प्रचलित होत्या मात्र, परंपरेने त्या आधी कधी त्यांना अष्टपदी अशी संज्ञा दिलेली नाही.
ज्याने स्वतःला आपल्या काव्यात ’शृंगार सारस्वत’ म्हटले आहे, त्या कवी जयदेवाच्या गीतगोविंद या लघुकाव्यातील गेय प्रबंधांना साहित्य तसेच संगीत परंपरेने अष्टपदी असे म्हटले आहे. अर्थात, जयदेव स्वतः अष्टपदी असा शब्द वापरत नाही, तो आपल्या रचनांना, प्रबंध म्हणतो, जो शब्द आजही कर्नाटक संगीत पद्धतीत ’बंदिश’ अशा संदर्भाने वापरला जातो.
जयदेवाच्या गीतगोविंदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने तत्कालीन संस्कृत परंपरेतील काव्याचे रचनाबंध (फ़ॉर्मॅट) आणि संस्कृतात प्रचलित छंद सोडून, इतर प्राकृत, खासकरून अपभ्रंश भाषेतील रचनाबंधांचा आणि वृत्तांचा वापर केला. त्यामुळे अष्टपदी हा रचनाबंध (आठ पदांचे शृंगारकाव्य) कदाचित तत्कालीन प्राकृत भाषेत आधीच प्रचलित असेल, जो जयदेवाने संस्कृतात आणला. मानसोल्लासात सोमेश्वराने सिद्धाचार्य या बौद्ध कवीच्या चर्यागीतांबद्द्ल सांगितले आहे, ज्यांची रचना अष्टपदीसारखी भासते. अशाच काही प्राकृत रचना अष्टपदी रूपात आधीच प्रचलित असतील, मात्र संस्कृतात आणि एकूणात मुख्य प्रवाहात अष्टपदी जयदेवापासूनच प्रचलित झाल्या असे म्हणू शकतो.
Indian. <em>Krishna Gazes Longingly at Radha, Page from the "Lumbagraon Gita Govinda" Series</em>, ca. 1820-1825. Opaque watercolor and gold on paper, sheet: 11 1/8 x 14 3/8 in.  (28.3 x 36.5 cm). Brooklyn Museum, Designated Purchase Fund, 72.43 (Photo: Brooklyn Museum, 72.43_IMLS_SL2.jpg)
राधेचं मन वळवणारी सखी, कांगडा शैलीतील चित्र 

(Lumbagraon Gita Govinda" Series, Brooklyn Museum)

गीत गोविंद हे राधाकृष्णांच्या प्रीतीचे शृंगार काव्य आहे. राधा, कृष्ण आणि सखी या तीन पात्रांत रंगणाऱ्या या विविध अष्टपदींमध्ये, संयोग आणि वियोग शृंगार, आणि अष्टनायिकांचे सगळे प्रसंग सामावले आहेत.
नावाप्रमाणेच गीत गोविंदातील या अष्टपदी हे पठणाचे श्लोक नसून, गेय गीते आहेत, ती सुनिश्चित राग तालात बांधलेली आहेत, तसेच परंपरेने राग-तालांसह त्यांचे जतन केले आहे. स्वतः जयदेव कवी या गीतांचे गायन करत आणि त्यांची पत्नी पद्मावती या गीतांवर नृत्य सादर करत असे, असा उल्लेख आहे. त्यामुळे या गीतांची रचना संगीत-नृत्य सादरीकरणाच्या दृष्टीने केली गेली होती असे म्हणता येईल.
अष्टपदी हा शब्द खासच जयदेवाच्या प्रबंधासाठीच प्रसिद्ध झाला. आज कथक खेरीज इतर सर्व शैलींमध्ये अष्टपदी हा प्रकार सादर केला जातो. ओडिसीमध्ये तर भावांगाचा मुख्य भाग अष्टपदी आहेत. मात्र जयदेवाच्याच अष्टपदी, अष्टपदी म्हणून सादर केल्या जातात. ओडिसीमध्ये अनेक ओरिया भाषेतील गीते सादर केली जातात जी कविसूर्य सारख्या ओरिया कवींनी गीतगोविंदावर आधारित म्हणून रचली आहेत. मात्र सादरीकरणात त्यांना अष्टपदी म्हणून सादर केले जात नाही. अष्टपदी जयदेवाची सादर केली जाते.
जयदेवाच्या अष्टपदी प्रसिद्ध झाल्यानंतर, अष्टपदींनी प्रभावित होऊन त्यावर आधारित अनेक रचना केल्या गेल्या. कवि रामपाणि यांनी अगदी याच धर्तीवर ’गीतरामम्’ या रामकथेवर आधारित अष्टपदी रचल्या. महाकवी विद्यापती ठाकुर हे मैथिली भाषेतील कवी. त्यांना ’अभिनव जयदेव’ म्हटलं जात असे. त्यांनी गीतगोविंदावर आधारित पदावल्या संस्कृतात तसेच मैथिलीमध्ये लिहिल्या, चैतन्य महाप्रभू गीतगोविंदाकडे ओढले गेले ते आधी विद्यापतींच्या अष्टपदी वाचूनच. गुजरातेत कवी नरसी मेहतांनी शृंगारमाला लिहिली. स्वामी नारायण तीर्थांनी अठराव्या शतकात गीत-गोविंदाच्याच रचनाबंधानुसार कृष्ण लीला तरंगिणी लिहिली. मात्र, या पुढील सर्व कवींनी अष्टपदी किंवा अष्टपदी सदृश रचना करताना, जयदेवाच्या परंपरेचे अनुसरण केल्याचा उल्लेख केला आहे.
जयदेवाच्या अष्टपदी दक्षिणेतही पुढे पुष्कळ प्रसृत झाल्या. दक्षिणी संगीतात तर प्रबंध प्रकार म्हणून अष्टपदी रुजलीच पण त्याचबरोबर, काही धार्मिक कार्यांचा ती अविभाज्य भाग बनली. सोपान पद्धतीने गायली जाऊ लागली. अष्टपदींवर आधारित नृत्यनाट्य सादर केले जाऊ लागले ज्याला अष्टपदी-आट्टम् असे म्हटले गेले. अष्टपदींवरच आधारित कृष्णनाट्टम हाही एक नाट्यप्रकार रूढ झाला होता, जो श्री मानवेद कवीच्या काव्यावर आधारित प्रकार असून यात आठ भागात अष्टपदी आठ रात्री सादर केल्या जात असत. या दोन्ही नाट्य-नृत्य प्रकारांना आज नर्तक नव्याने नवसंजीवनी देत आहेत. खालील व्हिडिओमध्ये या पुनरुज्जीवित अष्टपदी-आट्टम ची झलक दिसून येते, ज्यात - राधा-कृष्ण आणि सखी बरोबरच जयदेव व त्यांची एक पत्नी हेही एक पात्र आहेत. अशा प्रकारे अष्टपदी आणि जयदेव यांच्यातील समानार्थीत्व अधोरेखित होईल.


अगदी अलिकडच्या काळापर्यंत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीत अष्टपदी गीतीप्रकार म्हणून प्रसिद्ध होती. बडे बालकृष्णबुवा यांनी सादरीकरणाच्या उत्तरार्धात, छोट्या ख्यालाप्रमाणे अष्टपदी सादर करण्यास सुरुवात केली आणि पुढेही अनेक गायकांनी अशा अष्टपदी सादर केल्या. मात्र, जयदेवाच्याच विविध अष्टपदी ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेत प्रचलित झालेल्या दिसतात.
अशाप्रकारे अष्टपदी, हे कोणत्याही आठ कडव्यांच्या गीताला मिळालेले नाव नसून, जयदेवापासून सुरू झालेली ही एक अष्टपदी-परंपरा आहे, जी साहित्य, गायन, नृत्य व नाट्य या सर्व माध्यमांमध्ये दिसून येते.

कथकमधील अष्टपदींचे सादरीकरण :

अष्टपदी ही कथक परंपरेत कधी सादर केली जाऊ लागली याचा निश्चित पुरावा सापडत नाही. कथकमध्ये आज जयदेवाच्या अष्टपदी सादर केल्या जातातच पण त्याच बरोबर, कथक-महर्षि पं.बिंदादीन महाराज यांची अष्टपदी ’निरतत ढंग’ अधिकतम वेळा सादर केली जाते. ही अष्टपदीची बंदिश कथकच्याच काही परंपरांमध्ये, भजन किंवा पद म्हणून सादर केलेली दिसते. त्यामुळे, मूळ रचनाकारांनी याला अष्टपदी म्हणून रचले होते की रचनाबंध-साधर्म्यामुळे नंतर ही अष्टपदी प्रकारात प्रचलित झाली याचा निश्चित पुरावा सापडत नाही. मात्र, अष्टपदी परंपरेची सर्व वैशिष्ट्ये यात दिसून येतात. एकाच वृत्तातल्या आठ कडव्यांच्या या अष्टपदीत रासनृत्याच्या प्रसंगाचे व त्या अन्वये प्राचीन कथक नृत्याच्या विविध अंगांचे वर्णन आहे. ’निरतत ढंग’ हे सुकुमार नर्तनाचे सूत्र, कृष्णाच्या शृंगारात, गोपींच्या नृत्यात, राधेच्या वर्णनात समान आहे, जे प्रत्येक अंतऱ्यानंतर पुनरावृत्त होते. याखेरीज आणखी एक अष्टपदी विशेष करून जयपूर घराण्याच्या परंपरेत प्रचलित आहे. ’नंदनंदन नाचत सुढंग’ ही अष्टपदी सूरदासांची रचना म्हणून प्रसिद्ध आहे. विषयवस्तु अष्टपदी अनुसार असली तरी, या रचनेचे केवळ दोन अंतरे प्रचलित आहेत. तसेच, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूरदासांची ही रचना केवळ कथकच्या परंपरेतच रूढ आहे, अन्य हिंदी साहित्यात या रचनेचे संदर्भ सापडत नाहीत.

अष्टपदी आणि अष्टक –
कोणत्याही आठ कडव्यांच्या गीतास अष्टपदी म्हणता येईल का?

अष्टपदी आणि अष्टक या दोन प्रकारांमध्येही विशेष करून कथकारांमध्ये गल्लत दिसून येते. या दोन प्रकारांमधील भेद पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. अष्टक हे स्तोत्र-प्रकारातील आठ पदांच्या/अंतऱ्यांच्या समूहास दिले जाणारे नाव आहे. अष्टके ही अष्टपदी प्रकारांपेक्षाही प्राचीन आहेत. एखाद्या देवतेची स्तुती, साधारणपणे समान वृत्तातल्या आठ पदांनी केली जाते तेव्हा त्यास अष्टक म्हणायची पद्धत आहे, अष्टकाप्रमाणेच इतरही संख्यांची स्तोत्रे आहेत, षटक, एकादश इ.
मूळात लघुकाव्यांचे शृंगारिक (emotive) आणि भक्तिविषयक (devotional) असे जे दोन ढोबळ प्रकार केले जातात, त्यात अष्टपदी शृंगारिक प्रकारात मोडते, आणि अष्टक भक्तिविषयक.
 (जयदेवाची पहिली अष्टपदी जय जगदिश हरे ही याला अपवाद, कारण ती एकूणात त्याच्या रचनेची सुरुवात असल्यामुळे, अष्टपदी-संग्रहाची पहिली अष्टपदी भारतीय परंपरेनुसार, ईशवचनाची असणे सहाजिक आहे.)
अष्टपदी हा तांत्रिकदृष्टया द्विधातु-प्रबंध अशा बंदिश प्रकारात मोडतो. द्विधातु म्हणजे एक पल्लवी आणि अनेक चरणे किंवा एक स्थायी आणि अनेक अंतरे. तसेच स्थायीमधील पंक्ती प्रत्येक अंतऱ्यानंतर पुनरावृत्त होते. अष्टकात ही पुनरावृत्ती असेलच असे नाही.
अन्त्यानुप्रास, म्हणजेच पदाच्या शेवटच्या शब्दाने यमक जुळवणेही खास करून अष्टपदीत दिसून येते, अष्टकात ते असलेच पाहिजे असा नियम नाही.
अष्टपदी हा मूळात गेय प्रकार आहे, गीताप्रमाणे सादर केला जातो. स्तोत्रही गीताप्रमाणे सादर केला जाऊ शकते, पण मूळात त्याची रचना पठणासाठी केलेली असते, गायनासाठी नाही.
अशा प्रकारे, अष्टक आणि अष्टपदी हे दोन निश्चित वेगळे प्रकार असून, श्रीकृष्णाष्टक, मधुराष्टक इत्यादिंना अष्टपदी अंतर्गत समाविष्ट करता येणार नाही.
किंबहुना, कोणत्याही आठ पदांच्या/कडव्यांच्या गीतीप्रकाराला अष्टपदी असे म्हणता येणार नाही. मूळात आठ हा आकडा काटेकोरपणे जयदेवानेही वापरलेला नाही. गीतगोविंदातीलही काही अष्टपदी आठपेक्षा कमी किंवा अधिक पदांच्या आहेत. त्यावर आधारित पुढे ज्या अष्टपदी रचना झाल्या त्यांच्यातही आठ आकड्याचे काटेकोर पालन केले आहे असे नाही. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीत जे अष्टपदी गायन प्रसिद्ध होते, त्यातही जयदेवाच्या रचनेतील स्थायी आणि एखादाच अंतरा घेऊन छोट्या ख्यालाच्या बंदिशी प्रमाणे गायनाची पद्धत होती, त्यातही आठ पदे गाण्याची परंपरा नव्हती.

तेव्हा अष्टपदी हे आठ-पदांचे गाणे नसून, अष्टपदी ही एक निश्चित परंपरा आहे त्या परंपरेतील किंवा त्या परंपरेचे अनुसरण करणाऱ्या गीतांनाच अष्टपदी म्हणता येईल.
अष्टपदी आणि कथकमधील तिचे सादरीकरण असा विचार करता अष्टपदीची पुढील वैशिष्ट्ये आपल्याला निश्चित सांगता येतील :
1. अष्टपदी जयदेव रचित, जयदेव परंपरेतील असावी किंवा त्या परंपरेचे अनुसरण करणारी असते.
2. आठ पदांचे गीत असते मात्र, स्थायीची ओळ प्रत्येक अंतऱ्यानंतर पुनरावृत्त होते. स्थायीच्या पुनरावृत्त होणाऱ्या ओळीत अष्टपदीचे कथासूत्र (थीम) असते ज्याचा विस्तार अंतऱ्यांमध्ये केला जातो.
3. विषयवस्तु शृंगारिक किंवा मधुराभक्ती संबंधित, तसेच एका विशिष्ट प्रसंगाचे, कथासूत्राचे वर्णन असते. सामान्य स्तुतीपर विषयवस्तु नसते.

आज कथकमध्ये अष्टपदीचे सादरीकरण अध्ययनाचा भाग म्हणून अधिक राहिलेले दिसते, कारण कदाचित आठ कडव्यांमुळे लांबलचक होणारी अष्टपदी सादरीकरणासाठी कंटाळवाणी होत असावी. मात्र अष्टपदीमध्ये जर आठ आकडा महत्वाचा नसेल तर, अष्टपदीचा विषय स्पष्ट करणारे दोन ते तीन अंतरे निवडून कथकार सादरीकरणासाठी अष्टपदीचा विचार करू शकतात. तसेच अनेक नाविन्यपूर्ण पद्धतीने कथकमध्ये अष्टपदी हा एक रंजक प्रकार म्हणून सादर करता येऊ शकते.
अष्टपदीतील राधाकृष्णांचा ललित शृंगार कथकच्या इतरही बंदिशींना साजेसा आहे. त्यामुळे अष्टपदीतील लालित्य, त्याच विषयाला साजेशी अनेक कवित्त-छंद, अनेक गतनिकास, लहान-लहान गतभाव घालून फ़ुलविता येईल. त्याचबरोबर, अष्टपदीची छोटी बंदिश, एखाद्या त्याच विषयाच्या विस्तृत ठुमरीच्या प्रारंभी विषय प्रस्थापित करण्यासाठी घालता येईल.
कथकला साचलेपणातून बाहेर काढून, प्रवाही बनवताना, ज्याप्रमाणे अनेक नवीन रचनाप्रयोग त्यात करणे हा एक मार्ग आहे, त्याचबरोबर जुन्या लोप पावत चाललेल्या रचनाबंधांना शास्त्राच्या चौकटीतले पण आजच्या काळाचे रंग ल्यालेले नवे रूप देणे हाही एक आवश्यक मार्ग आहेच. अष्टपदीचे अभ्यासपूर्ण सादरीकरण हे या दुसऱ्या मार्गाचे उत्तम उदाहरण ठरेल.