Monday, April 18, 2016

वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह

  

(हे वस्तुनिष्ठ प्रश्न अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रवेशिका पूर्ण असेच मध्यमा पूर्ण परीक्षेसाठी उपयोगी आहेत)

(उत्तरे शेवटी दिली आहेत)

Objective Question Bank with Answers



  1.    झपतालात ______, _______ आणि _______  मात्रेवर ताली येते.

  2.    गुरू केलुचरण महापात्र हे महान नर्तक ________ या नृत्यशैलीचे गुरू होते.

  3.    गुरू कनक रेळे या ___________ नृत्यशै  लीशी विशेष संबंधित आहेत.

   4.    श्री राजा रेड्डी व राधा रेड्डी हे ___________ नृत्यशैलीचे नर्तक आहेत.

  5.    ______________ या आसामच्या नृत्यशैलीला नुकतीच शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.

  6.    कथक हे शास्त्रीय नृत्य __________ येथील आहे.

  7.    गत निकास ही __________ घराण्याची विशेषता आहे.

  8.    हरिहरप्रसाद हे __________ घराण्याचे नर्तक होते.

  9.    पं. शिवकुमार शर्मा हे_________ या वाद्याशी संबंधित आहेत.

 10.  उस्ताद झाकिर हुसेन हे _______ वादक आहेत.

 11.  पंडित रवीशंकर हे प्रसिद्ध __________ वादक होते.

 12.  पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध _________ वादक आहेत.

13.  सर्व शास्त्रीय नृत्य शैलींचा आधार असलेले ग्रंथ म्हणजे भरतमुनींचे ___________ आणि नंदिकेश्वराचे __________


 14. आकड्यांचा उपयोग करून तयार केलेल्या तिहाईला ____________ म्हणतात.

 15.  तिहाईचे लहान रूप म्हणजे ___________.

 16.  मुद्रा __________ प्रकारच्या असतात, त्या म्हणजे __________, ___________ आणि ____________.

 17.  कथकमध्ये ताल सादरीकरणात हार्मोनियमवर ____________ वाजवला जातो.

 18.  जयपूर घराण्याचे संस्थापक ___________ होते.

 19.  तिहाई जेव्हा तीन वेळा म्हणून समेवर येते तेव्हा तिला _____________________ म्हणतात.

  20.  एखादी काव्यरचना तालात बांधलेली असते व नृत्यबोलांप्रमाणे सादर केली जाते तिला ________ म्हणतात.

  21.  समेची खूण म्हणजे __________.

  22.  विभागाची खूण आहे ________.

  23.  0 ही खूण _____________ दाखविण्यासाठी वापरली जाते.
  
  24.  मात्रा _____________ या खुणेने दर्शवली जाते.
  
  25.  गिद्धा हे लोकनृत्य __________ प्रांतातील आहे.

  26.  संथल हे लोकनृत्य _______ प्रांतातील आहे.

  27.  पखवाजाच्या जोरदार बोलांच्या बंदिशीला _________ असे  म्हणतात.
  
  28.  कथकची सुरुवात ज्या भक्तिपर गीतप्रकाराने होते त्याला __________ म्हणतात.

  29.  ___________ ही शास्त्रीय नृत्य शैली केवळ स्त्रियांद्वारे केली जाते.
  
  30.  _____________ ही आंध्रप्रदेश येथील शास्त्रीय नृत्यशैली आहे.

  31.  ईश्वरी प्रसादजी हे ____ घराण्याचे प्रवर्तक होत.
  
  32.  कथकमध्ये बोल बोलून दाखवण्यास ________ असे म्हणतात.

   33.  नटवरी हे ___________ नृत्यशैलीचे दुसरे नाव आहे.

  34.  झपतालात खाली _______ मात्रेवर येते.

  35.  तीनतालात खाली ____________ मात्रेवर येते.

  36.  दादरामध्ये _______ मात्रा असतात तर केहेरवामध्ये _______ मात्रा असतात.

  37.  ताल दादरामध्ये ________ असे विभाग असतात.

  38.  ताल केहेरवामध्ये ___________ असे विभाग असतात.

  39.  झपतालात ______________ मात्रा असतात.

  40.  धागीना-धातीना हा _____________ तालाचा ठेका आहे.

  41.  केहेरवा तालाची खाली _______________ मात्रेवर येते.

  42.  दादरा तालाची सम ____ मात्रेवर येते.

  43.  देव-परीकी जोडी हे नाव _____________ यांच्यासाठी वापरले जात असे.

  44.  लय _______ प्रकारची असते ती म्हणजे ___________, __________, __________.

  45.  थाट सामान्यतः _________ लयीत केले जातात.
  
  46.  गत सामान्यतः ___________ लयीत केली जाते.
  
   47.  ज्या विभागाला तालीद्वारे दर्शवले जात नाही त्याला ___________ द्वारे दर्शवले जाते.
  
   48.  समान विभाग असलेल्या ताल खंडांना __________

 म्हणतात, तर असमान विभागणी असलेल्या ताल खंडांना असमान 

  विभाग म्हणतात.

  49.  गतनिकास करताना सुरुवातीच्या उलट सुलट चकरांना ____________ म्हणतात.

  50.  गतभावात, व्यक्तिरेखेतील बदल __________ घेऊन दाखवला जातो.

  51.  तत्कारातील वेगवेगळ्या प्रकारांना _________ म्हणतात.

  52.  एका आवर्तनाच्या लहानशा तोड्याला ___________ म्हणतात.

  53.  ताल प्रदर्शनाच्या सुरुवातीला सादर केला जाणारा पारंपारिक पूर्ण बोल म्हणजे _________.

  54.  परण जोडलेल्या आमदला _______________ म्हणतात.

\ 55.  समेपासून समेपर्यंत तालाच्या एका पूर्ण चक्रास _________ म्हणतात.

  56.  तिहाईच्या पल्ल्यांमधील विरामास _________ असे म्हणतात.
  
1 57.  जोड्या जुळवा

 १.      कुमुदिनी लाखिया                     १.       4थ्या मात्रेवर खाली                                 
  २.      रुक्मिणीदेवी अरुंडेल                 २.       कथक नर्तक                             
  ३.      दादरा                                     ३.       एका मात्रेचे 3 विभाग                                       
  ४.      केहेरवा                                   ४.       बनारस घराणे                                   
  ५.      तिश्र जाती                            ५.       भरतनाट्यम    
             
  ६.      चतुश्र जाती                         ६.       5 व्या मात्रेवर खाली                  
  ७.      नाट्यशास्त्र                           ७.       ठुमरीचे रचनाकार

  ८.      पं. बिंदादीन महाराज             ८.       भरतमुनी 
                   
  ९.      पं. सुखदेव महाराज        ९.       एका मात्रेचे4 विभाग  



उत्तरे
  1. 1,3,8
  2. ओडिसी
  3. भरतनाट्यम
  4. कुचिपुडी
  5. सत्रीय
  6. उत्तर प्रदेश
  7. लखनौ
  8. जयपूर
  9. संतूर
  10. तबला
  11. सतार
  12. बासरी
  13. नाट्यशास्त्र, अभिनयदर्पण
  14. गिनती
  15. तिया
  16. 3, संयुक्त, असंयुक्त, नृत्त
  17. लहरा
  18. गीधाजी
  19. चक्रदार तिहाई
  20. कवित्त
  21. X
  22. |
  23. खाली/काल
  24. _
  25. पंजाब
  26. बिहार
  27. परण
  28. वंदना
  29. मोहिनीअट्टम
  30. कुचिपुडी
  31. लखनौ
  32. पढंत
  33. कथक
  34. 6
  35. 9
  36. 6,8
  37. 3-3
  38. 4-4
  39. 10
  40. दादरा
  41. 5
  42. 1
  43. हरिहरप्रसाद-हनुमानप्रसाद
  44. तीन, विलंबित, मध्य, द्रुत
  45. विलंबित
  46. द्रुत
  47. खाली
  48. सम, विषम
  49. गतपल्टा
  50. गतपल्टा
  51. बाँट
  52. तुकडा
  53. आमद
  54. परण-जुडी आमद
  55. आवर्तन
  56. दम
  57. 1-2, 2-5, 3-1, 4-6, 5-3, 6-1, 7-8, 8-7, 9-4














   





























No comments:

Post a Comment