Thursday, April 23, 2020
Wednesday, April 22, 2020
The making of a proficient dancer
The Indian classical dance forms are mostly performed solo. Further, even
in case of a solo presentation or a group, Aharya abhinaya (themed
costumes or backdrop, property, etc.) is limited. Even the accompanying
orchestra is simple and hence the performance mainly rests on the shoulders of
the dancer. This stands truer in the case of Kathak with its neutral costumes and
the format that offers broad scope for extempore. Since it is the dancer who is
‘in-charge’ of the whole presentation, the evaluation of any Kathak
presentation is indeed the assessment of the Dancer themselves. Hence it is important
to discuss the attributes that make a good dancer. Understanding the qualities
of a flawless dancer is imperative for everyone; from aspiring dancers to
professionals and to the dance mentors carving the dancers.
The discussion of qualities of a good dancer is found in the Natyashastra,
however, the discussion has many facets and details in the medieval texts such
as Sangeetsamaysaar, Nartananirnaya, Nrittaratnavali as well. The
attributes mentioned here include some indispensable qualities and some
attributes that will be an added advantage for the dancer. These attributes are
mentioned:
1. Training (सुविद्यता):
Training from a proficient guru which is called as ‘talim’ is the
basic prerequisite for any classical dancer. The online platforms today have
uncountable video tutorials for many dance forms. However, classical dance
style is still an exception as Seena-Basina (सीना-बसीना), which literally translates to ‘in-person training’ wherein the Guru mentors
the student in accordance with their capabilities, style, physique, etc. The
learning in fact never concludes. Even after you start performing and teaching
independently, your talim with your Guru should not be
discontinued. The continual learning is essential for your performance as well
as teaching. Thus, methodological talim and lifelong is the basic
attribute of any dancer.
2. Tuning up with Riyaz (श्रमित्वं) :
Regular Riyaz
is the only way to achieve perfection and speed in Hastak, body
movements, and footwork. With strenuous
practice, the dancer can render every bol clearly with the sound of feet (चरणन्यासचातुर्य). Additionally, the dancer must
have “वलनं वर्तनं गात्रे”, flexible and graceful movements which perfect stretches which are called
as तोड-मरोड in Kathak. Riyaz hones every action of the dancer rendering their motion,
strokes, and movements a sculpted and picture-perfect character.
3. Enacting and mimetic skills (सर्वाभिनयनेतृता):
The dancer must have the capacity to
mirror emotions and characters through their eyes, eyebrows, facial expressions, and overall body language. This Abhinaya skill is developed with the teachings
of the Guru and self-exercise alongside reading and introspection.
4. Command on rhythm and technical know-how
A sense of rhythm and command on the Taal-cycle are qualities that
demonstrate a dancer’s skill and mettle. The expertise of Laya and taal
in Kathak is imperative for proficient presentation with Lehra as
well as for good padhant. This capability called a sense of rhythm is
considered inborn however, constant riyaj is also instrumental in
building this capacity.
Along with the sense of rhythm, the Kathakar must also be well-accomplished
with an overall outline of the taal with sam, Khali, Bhari.
He or she should also proficient in other aspects of taal such as
various patterns of Jati’s, Yati’s, Graha (Atit and
anagat).
5. Creativity (कलाभिज्ञा विद्याभीष्टप्रयोगज्ञा)
The dancer must also be able to innovate, re-imagine and experiment in the
framework of Classicism according to the contemporary currents in the art. As
an artist, they should also be responsive to the audience taste and the
changing subject matters in society. Nonetheless, these experiments should
be based on the courage of innovation backed by the detailed study of the
subject.
6. Presentational skills: (सभाजय)
The dancer stuns and wins the audience by various skills including
intricate and swift body movements, astonishingly speedy footwork, rendering
complex sounds with feet and sometimes by extra-ordinary jumps and leaps.
Although these skills are considered gimmicky in classical dance contexts; deploying
these methods with restraint can up the awe-factor and entertainment quotient
of the performance. But it is important
to understand that these methods or exaggerations must not be used to
compensate for the lack of creativity, skill, riyaz, and other parameters
that are the foundations of a good presentation. These extraordinary methods
are add-ons that embellish the performance and not core or crux of the
dance-form.
The presentation skills for a Kathak dancer also include the ability to retain
an expressive and lively countenance throughout the performance. One more
critical quality is to build and establish an eye-contact with the audience in
the performance. This quality is termed as सुतारा in the texts.
7. Spontaneity for Upaj (सुबुद्धित्व):
Upaj is a technical word meaning the extempore or the impromptu part in the performance.
A good dancer goes beyond the rehearsed matter and adds spontaneous colors in
taal as well as bhaav anga. This capacity of the unscripted performance
is built by the extensive experimentations and independent riyaj of Upaj.
8. Maintaining the bearing and composure (अत्रुटद् -रसता):
This is the capacity of being in
character or being in the composure of the performer throughout the performance.
Performing with live music is a challenge and it is furthered with
maintaining the composed body language, adjusting with the live music (that may
or may not be perfectly scripted) and simultaneously exhibiting the facial
expressions flawlessly.
Also, an associated important quality is divided attentiveness where the
dancer is absorbing the live music and handling the costume, gauging the
spontaneous feedback from the audience, all at the same time. An accomplished dancer
is the one capable of divided attention.
9. आरंभामोक्ष
विज्ञत्वं-
The age-old
attribute mentioned in the scriptures is equally relevant today. The brilliance
of impressive beginning of the performance and culminating closing is necessary
for the ascending impact. The mature artist is the one who knows when to stop!
An associated attribute with this is the awareness about one’s own pluses
and minuses and further wisdom of highlighting the pluses and hiding the
minuses in the performance.
10. Curious inquiry (कुतुहलं):
Curiosity about the cutting-edge waves in the global dance field and
updating oneself with the knowledge of the new experiments in the dance,
expands the vision of the dancer.
11. Acquaintance
with vocal and instrumental music (गीतवाद्यानुकारित्व):
Kathak dancer always performs as a team with live musicians. The dancer
must be sensible enough to present the performance as a team-work. He or she
must pay due respect to the musicians and must not consider them as mere
subordinate accomplices.
The knowledge of vocal and instrumental music or even formal training of
the same proves to be an added advantage for the dancer. Many renowned
senior Kathakars are also accomplished in singing and tabla. The traditional style of Thumri presentation in Kathak also includes singing by the
dancer himself and such presentation “स्वयं गा कर प्रस्तुती” is
considered as extraordinary. Even the scriptures have classified that dancer as
extra-ordinary who has vocal skills too. As the Nrittaratnavali
says: नर्तकी गायनी
स्याच्चेत् भोगिनी पात्रमन्यथा॥ The dancer who is also a good singer proves to be an out of this world/superlative
artist.
12. Physical attributes:
The dance
manuals have discussed the physical attributes of a female-dancer in more
detail than the male. Being an audio-visual art, the body is the essential
medium of the presentation. The dancer should have a proportionate and shapely
body, not too tall, not too short. The dancer may have a fair countenance or
dark, but it should be fluidly expressive. However, Jayasena has a
liberal approach to physical attributes:
रूपयौवनयुक्तानां सहस्रेऽपि
मृगीदृशाम्।
कलागुणसमेतानां नर्तकी नैव
लक्ष्यते।
The dancer proficient in art is surpasses many other dancers with mere
physical beauty. This stands true today as we witness many successful
performers who may not be ‘beautiful’ as per stereotypical standards.
13. Teaching skills:
The shastras talk about this attribute regarding male dancers mainly, since
traditionally male dancers were viewed as Acharyas or mentors or teachers
whereas female dancers were mainly viewed as performers. However, the classical
dance scene in the 21st century makes the teaching skill essential for
every dancer who considers dance as a full-time profession.
Apart from these dance-related attributes, the scriptures also mention some
general human qualities necessary for a good artist. These include politeness, discipline,
zero dependence on artificial stimulants, does not consume products that harm
and the mind and body, etc. It mandates overall
habits that are essential for physical and mental wellbeing alongside behavior
that is appropriate, virtuous, and
beneficial to society.
Apart from these qualities mentioned traditionally in the dance manuals, in
line with the current times, some other attributes are worth adding in the list:
1. Being techno-savvy is the need of an hour:
The classical dancer must have sound knowledge of technological
developments in the dance field and he should also make good use of the
technology. For a Kathak dancer, technological knowledge may include basic
knowledge of stage lights, sound, knowledge about audio and video recording,
various applications for accompaniment, the lehra applications, tabla
applications, etc. The dancer should also be able to use social media
effectively for reaching the people with his or her creations.
2.Liberal and welcoming attitude:
The field of Kathak is witnessing unprecedented spread and new experiments
today. In such a scenario, liberal and respectful attitude towards different
style, different opinion, and different Gharana is necessary for the development
of the dancer and the field both.
Weaknesses:
Most of the Shastrakara’s have not discussed the flaws of a dancer
in detail but have simply mentioned that lack of attributes can be considered
as a weakness. Nevertheless, they have mentioned a few like ignorance about lay-taal,
physical disability, lethargy towards Riyaz, addictions, lack of
spontaneity for Upaj.
These are some other weaknesses that are bypassed by the successful dancers
today and hence are worth mentioning:
1.Both the extremes: Extreme rigidity about the tradition or disregard
Blind stubbornness about the tradition saturates the art-form. Lack of
readiness to adapt the traditions to the changing times and shifting audience
mindsets is definitely a flaw in the current age. At the same time, shallow
modernity where mediocre new experiments with lack of knowledge about the
tradition that pollutes the style is an equally dangerous catch.
2. Delusive stardom and resulting lack of professionalism:
Classical dance in India is bequeathed a divine stature. But often, the
artist mistakenly assumes the divinity of art on the individual self, resulting
in a superiority complex. It is the art that is regarded supreme, and not
necessarily the artist. This superiority complex may lead to unprofessional
practices on part of the artist like quench of publicity, demeaning the
audience or co-artists, fragmentary teaching, etc.
Nonetheless, many senior dancers today have achieved the peak of success and still managed to refrain from these flaws.
“If you are not moving forward, then you are moving backward.”
The artist moves forward by constant efforts of eliminating flaws and enriching
the good qualities. Otherwise, the backward journey is inevitable.
Sunday, April 12, 2020
नर्तक अथवा नर्तकीचे गुण व दोष
भारतीय शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण हे परंपरेने
एकल म्हणजे सोलो केले जाते. शिवाय, एकल असो अथवा समूह, आजही शास्त्रीय नृत्य
सादरीकरणात बहुतेक शैलींमध्ये आहार्य अभिनयाचा (कॉस्च्युम, प्रॉपर्टी, बॅकड्रॉप
इ.) फ़ारच कमी वापर केला जातो. सादरीकरणात साथसंगतही मोजकी घेतली जाते आणि नर्तकच
सादरीकरणाचे नेतृत्व करत असतो.
कथकच्या बाबतीत तर हा मुद्दा अधिकच अधोरेखित
होतो, याचे कारण म्हणजे एकतर कथकच्या वेशभूषेतील साधेपणा आणि दुसरे म्हणजे कथकच्या
सादरीकरणाचे बऱ्यापैकी अनिबद्ध रूप. अनिबद्धतेमुळे सादरीकरणात उपज भाग बऱ्यापैकी असतो.
यामुळे कथकशैलीच्या बाबतीत सादरीकरणाची एकूण जबाबदारी पुष्कळ प्रमाणात नर्तकावरच
असते, त्यामुळे एखाद्या कथक सादरीकरणाची समीक्षा किंवा त्यातील गुण-दोषांची चर्चा
म्हणजे खरंतर नर्तकाच्याच गुणदोषांची चर्चा असते. म्हणूनच नर्तकाच्या गुणदोषांच्या
चर्चेला शास्त्रकारांनीही महत्त्व दिले आहे. आजच्या नर्तक होण्याची मनीषा असणाऱ्या
विद्यार्थ्यांपासून, नर्तक म्हणून व्यावसायिक कार्य करणाऱ्यांपर्यंत आणि नर्तक
घडविणाऱ्या आचार्यांपर्यंत हा विचार आवश्यक आहे की, कोणाला आदर्श नर्तक म्हणावे,
कोणते गुण नर्तकात अनिवार्यपणे असलेच पाहिजेत, कोणते गुण अनिवार्य नाहीत पण
नर्तकाला उंचीवर नेणारे आहेत आणि कोणते दोष नर्तकाच्या गुणांना मातीमोल करणारे
आहेत.
अभिनयदर्पणात नर्तकलक्षणांचा स्वतंत्र विचार
नसला तरी पात्रलक्षणे दिली आहेत ज्यात नट व नर्तकाच्या गुणांची एकत्रित चर्चा केली
आहे. संगीतसमयसार, नर्तननिर्णय, नृत्तरत्नावली अशा नंतरच्या ग्रंथांमध्ये नर्तक व
नर्तकी दोघांच्या गुणदोषांची स्वतंत्र चर्चा दिसते.
शास्त्रात सांगितलेल्या गुणांपैकी काही गुण
नर्तकाला अंगभूत असणे आवश्यक आहे तर काही तालमीतून प्राप्त होतात तर काही अथक
रियाजातून प्राप्त करावे लागतात. पुढील काही गुण शास्त्रकारांनी सांगितले आहेत:
1. तालीम (सुविद्यता):
उत्तम गुरूंकडून
नृत्याची विधिवत तालीम घेतलेली असणे नर्तकासाठी अनिवार्य आहे. आजच्या तंत्रज्ञान
क्रांतीच्या क्षेत्रात अनेक नृत्य प्रकार
युट्यूब व्हिडिओ ट्युटोरियलच्या माध्यमातून शिकण्याची सोय असली तरी शास्त्रीय
नृत्य कला याला सन्माननीय अपवाद म्हणता येईल. आजही “सीना-बसीना”, प्रत्यक्ष
गुरूंकडून शिकण्याला पर्याय नाही.
याखेरीज, शास्त्रीय नृत्यकलेत, आजीवन
विद्यार्थी-दशा सांगितली आहे. व्यावसायिक नर्तक, अध्यापक म्हणून कार्य सुरू
केल्यावरही, तुमची तालीम सुरूच राहिली पाहिजे तरच, तुमच्या नृत्यात आणि
नृत्य-अध्यापनात चैतन्य टिकून राहील. अशा प्रकारे पद्धतशीर तालीम आणि आजीवन तालीम
हा नर्तकाचा पहिला अनिवार्य गुण म्हणता येईल.
2. रियाज (श्रमित्वं) –
नियमित रियाजाने
नर्तकाने आपल्या हस्तक, अंगसंचलनात वेग आणि अचूकता (perfection) प्राप्त केली
पाहिजे. अथक रियाजाने पायातून प्रत्येक बोल स्पष्ट काढला पाहिजे (चरणन्यासचातुर्य), यासोबत “वलनं वर्तनं गात्रे” (नृत्याच्या हालचालींमध्ये
गोलाई असणे) हाही एक गुण आवश्यक मानला आहे. रियाजाने प्रत्येक हालचाल लालित्य आणि
सौंदर्यपूर्ण होणे ज्याला कथकमध्ये तोड-मरोड म्हटले जाते.
3. अभिनयकौशल्य (सर्वाभिनयनेतृता) :
नर्तकाला डोळे, भुवया, हास्य इ. द्वारे चेहऱ्यातून तसेच एकूणच शारीर भाषेतून सर्व
प्रकारच्या व्यक्तिरेखा, सर्व रस तेवढयाच ताकदीने सादर करता यायला हवेत. अभिनय
कौशल्य प्राप्त करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन, अभिनयाचा रियाज, त्याचबरोबर
नर्तकाचा स्वतःचा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे.
4. लय-ताल-ज्ञान :
लय पक्की असणे, लयीची
समज असणे कलाकारासाठी आवश्यक आहे. कथक नर्तकासाठी तर लेहऱ्यावर विविध लयीच्या रचना
सादर करण्यासाठी, लेहऱ्याची उत्तम समज असण्यासाठी तर लय पक्की हवीच त्याचबरोबर
पढंत चांगली होण्यासाठीही लय स्थिर असणे आवश्यक आहे. लयीची समज खास करून सूक्ष्म
लयीची समज ही उपजत असावी लागते, मात्र अभ्यासानेसुद्धा लय पक्की होते.
कथक नर्तकाला लयी सोबत, तालचक्राचा एकूण आराखडा,
सम, खाली, भरीसह डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. लय तालाच्या ज्ञानाबरोबरच विविध
जाती, यती, ग्रह (अतीत-अनागत) वगैरे तांत्रिक बारकाव्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
5. प्रयोगशीलता (कलाभिज्ञा
विद्याभीष्टप्रयोगज्ञा)
शास्त्राच्या चौकटीत राहूनही काळानुसार, प्रेक्षकांनुसार,
विषयानुसार नवनवीन प्रयोग करायची क्षमता नर्तकात असायला हवी. त्याचबरोबर नवीन
प्रयोग केवळ धाडसाने नव्हे तर त्याजोडीला सखोल अभ्यास करून सादर करायची क्षमता
असणे आवश्यक आहे.
6. सादरीकरणातील सफ़ाई: (सभाजय)-
सभेला म्हणजेच प्रेक्षकांना जिंकून घेण्याचा गुण
नर्तकात आवश्यक आहे, याला आजच्या भाषेत प्रेझेन्टेशन स्किल म्हणता येईल. नर्तक कधी
नृत्यातील अंगसंचलनातील बारकाव्याने, कधी अफ़ाट वेगाच्या तत्कारांनी तर कधी,
पायातून वेगवेगळे नाद काढून, कधी अद्भुत गिरक्या, आकाशचारी सारख्या उड्या/छलांग
अशा प्रेक्षकांना आवडीच्या गोष्टी नृत्यात घालून प्रेक्षकांना अचंबित करेल. आजच्या
प्रेक्षकांचा विचार करता, entertainment quotient च्या, शास्त्रीय नर्तकालाही
या प्रेक्षकांना अचंबित करणाऱ्या या गोष्टी सादर करणे आवश्यक आहे. कथक नर्तकासाठी
प्रेझेन्टेशनचा भाग म्हणजे चेहरा नृत्तांगातही भावपूर्ण, प्रसन्न ठेवणे (स्मितपूर्वकृतालापा)
आणि त्याहूनही महत्त्वाचा गुण म्हणजे नजर बांधणे ज्याला eye-contact म्हटले जाते.
शास्त्रकारांनी या गुणाला ’सुतारा’ म्हटले आहे.
7. उपज-क्षमता (सुबुद्धित्वम्)
कथकच्या ताल आणि
भावांगात नर्तकाला आयत्यावेळी काही क्षणात विचार करून उपज सादरीकरण करता आले
पाहिजे. उपज क्षमता ही दीर्घ अनुभवानंतर आणि उपजच्या अशा स्वतंत्र अभ्यासानंतर
प्राप्त होते.
8. भाव-अखंड राखणे व अष्टावधान (अत्रुटद्
-रसता) :
नाटकाच्या भाषेत याल बेअरिंग न सोडणॆ म्हणता येईल. लाईव्ह-म्युझिक
म्हणजेच साथीदारांसह सादरीकरण करताना, एकाचवेळी स्वतःचे नृत्य आणि साथीदारांचे
नेतृत्व अशी तारेवरची कसरत करतानाही, नर्तकाने आपले तालांग आणि विशेषतः भाव अंगाचे
बेअरिंग न सोडणे, भाव अखंड व्यक्त करणे हे कसोटीचे असते. याला जोडूनच कलाकाराला अष्टावधान
हा गुणही आवश्यक आहे. साथीदारांशी जमवून घेत, नृत्यात प्राण ओतून, त्याचवेळी,
वेशभूषा इ. सावरून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे भान ठेवून, असे बहु-अवधाने ठेवून
सादरीकरण करतो तोच खरा उत्तम नर्तक होय.
9. आरंभामोक्ष विज्ञत्वं -
शास्त्रात
शतकांपूर्वी सांगितलेला गुण आजही प्रत्येक नर्तकात आवश्यक आहे. आपल्या सादरीकरणाची
सुरुवात प्रभावी आणि शेवट क्लायमॅक्सला नेणारा कसा करावा याची समज असणे हा
नर्तकासाठी मोठा गुण ठरतो. सादरीकरण कुठे थांबवायचे म्हणजे रटाळ होणार नाही याची
अचूक समज असणे हा प्रगल्भ कलाकाराचा गुण आहे. यालाच जोडून आणखी एक गुण
शास्त्रकारांनी सांगितला आहे तो म्हणजे- आपल्या गुणदोषांची पूर्ण जाणीव असणे आणि
त्यानुसार सादरीकरणात गुण अधिक अधोरेखित करणे आणि दोषपूर्ण अंग टाळता येणे.
10. कुतुहल:
अन्य शैलींबद्दल तसेच वर्तमानात देशविदेशात चालू असलेल्या अन्य प्रयोगांबद्दल
कुतुहल असणे व त्यांची माहिती करून घेणे हा कलाकाराला प्रगल्भ बनवणारा गुण आहे
11. गीत-वाद्याची समज (गीतवाद्यानुकारित्व)
लाईव्ह म्युझिक म्हणजेच साथीदारांसह सादरीकरण करताना टीम म्हणून काम करणे, साथीदार
कलाकारांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांच्याप्रती मंचावर आदर व्यक्त करणे, नर्तक मुख्य
आणि साथीदार गौण अशी भावना टाळून एक संच म्हणून, टीम म्हणून काम करणे हा आजच्या
काळात नर्तकासाठी महत्त्वाचा गुण आहे.
त्याचबरोबर स्वतः नर्तकाला गीत व वाद्याची
माहिती असणे, गायन-वादनाची तालीम घेतलेली असणे हा एक उपकारक गुण ठरतो. अनेक
मान्यवर कथक नर्तक उत्तम तबला वादक व गायक होते, आजही आहेत. ’स्वयं गा कर
प्रस्तुती’ हे अत्यंत कौशल्याचे समजले जाते. शास्त्रकारांनी मधुरस्वरा म्हणजेच
गायनही अवगत असलेल्या नर्तकीला सर्वश्रेष्ठ मानले आहे. नृत्तरत्नावलीमध्ये तर
म्हटले आहे, नर्तकी गायनी स्याच्चेत् भोगिनी पात्रमन्यथा॥
नर्तकी जर गायिका सुद्धा असेल तर तिची बातच और!
12. शारीरिक गुण
नर्तकापेक्षा नर्तकीच्या
बाबतीत खरं तर शास्त्रकारांनी शारीर गुणांची चर्चा वरील सर्व गुणांच्या आधी केली
आहे. नृत्य ही दृश्य कला असल्यामुळे, सादरीकरणात शरीर हे मुख्य माध्यम असते
त्यामुळे नर्तक किंवा नर्तकीचे शरीर सुडौल असायला हवे. फ़ार उंच नको किंवा फ़ार
बुटका नको. गोरा असो अथवा सावळा, चेहरा भावदर्शी म्हणजेच expressive असावा. कोणतेही
शारीरिक व्यंग नसावे. मात्र नृत्तरत्नावलीत जायसेनाने या शारीर गुणांच्या बाबतीत
उदार दृष्टिकोण घेतलेला आहे.
रूपयौवनयुक्तानां सहस्रेऽपि
मृगीदृशाम्।
कलागुणसमेतानां नर्तकी नैव
लक्ष्यते।
सौंदर्य असलेल्या हजार नर्तकींपेक्षा कलेमध्ये
प्रावीण्य मिळवलेली नर्तकी श्रेष्ठ. आजच्या काळातही हे तेवढेच सत्य आहे, कारण शारीर
लावण्य विशेष नसूनही कलेमध्ये उंची गाठलेले अनेक कलाकार आपण पाहतो.
13. अध्यापन कौशल्य:
शास्त्रकारांनी
हा गुण केवळ पुरूष नर्तकांमध्येच आवश्यक मानला आहे, कारण परंपरेने पुरुष
नर्तकांना, पुढे आचार्य किंवा गुरू रूपात पाहिले आहे, स्त्री नर्तकीला नेहमीच performer रूपात पाहिले आहे.
मात्र आज एकविसाव्या शतकातील शास्त्रीय नर्तनाचे क्षेत्र पाहता, अध्यापन कौशल्य व शिष्य
तयार करण्याची क्षमता प्रत्येकच नर्तकात असणे आज आवश्यक झाले आहे
शास्त्रकारांनी या नृत्यकलेशी संबंधित गुणांखेरीज
काही सामान्य गुणही नर्तकांमध्ये आवश्यक मानले आहेत, जसे विनम्रता, निर्व्यसनीपणा ई.
या परंपरेने सांगितलेल्या गुणांखेरीज अन्यही
काही गुण आजच्या काळाच्या दृष्टीने या यादीत समाविष्ट करावेसे वाटतात. ते पुढीलप्रमाणे:
14. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग:
तंत्रज्ञानक्रांतीच्या
या काळात शास्त्रीय कलाकाराने आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली पाहिजे व
त्याचा परिपूर्ण उपयोग केला पाहिजे. कथक नर्तकांसाठी यात, लेहऱ्याच्या applications पासून, रेकॉर्डिंगची
माहिती असणे, सोशल मिडियाचा प्रभावी वापर करता येणे असे अनेक गुण अपेक्षित आहेत.
2. उदारमतवादी असणे: आज कथकचा प्रसार व नवीन
प्रयोग प्रचंड होत आहेत. अशा काळात, आपल्याहून भिन्न शैली, घराणे आणि भिन्न मत
असलेल्या नर्तकांप्रती आदराची भावना नर्तकामध्ये असणे आवश्यक गुण आहे.
दोष:
बहुतेक शास्त्रकारांनी दोषांची तपशीलवार चर्चा
केली नाही तर गुण विशद केल्यावर, या गुणांचा अभाव असणे म्हणजेच दोष असे नमूद केले आहे.
तरीही लय-तालातील कमी-अधिकपणा लक्षातच न येणे, शरीरातील व्यंग, रियाजाचा आळस, व्यसनांच्या
आहारी जाणे, उपज सादर करण्याचे प्रसंगावधान नसणे असे काही दोष नमूद केले आहेत. या
दोषांखेरीज आजच्या काळानुरूप अन्यही काही दोष येथे नमूद करावेसे वाटतात जे आजच्या उत्तम
नर्तकांनी टाळले आहेत.
1. परंपरा आणि आधुनिक प्रवाह यातील कोणतेतरी टोक
गाठणे:
परंपरेचा आंधळा आग्रह नर्तकाच्या नृत्याला
साचलेपणा देतो. प्रेक्षकांसाठी बदलत्या काळानुसार, परंपरेच्या चौकटीतच
सौंदर्यपूर्ण बदल करण्याची मानसिकता नसणे, हा आजच्या काळासाठी मोठा दोष खरा. आणि
त्याचबरोबर, परंपरेला बासनात गुंडाळून आधुनिकतेच्या नावाखाली, कोणत्याही गोष्टींना
आपल्या शैलीत घुसवणे हा त्याहून मोठा दोष समजला पाहिजे.
2. काल्पनिक स्टारडम आणि त्यातून येणारी अव्यावसायिकता:
शास्त्रीय कलेकडे समाजाने नेहमीच पूजनीय व दिव्य
मानले आहे. मात्र अनेकदा कलाकार गल्लत करून दिव्य कलेऐवजी व्यक्ती म्हणून स्वतःला
अधिक दिव्य आणि असामान्य समजून बसतो. मग त्यामुळे, प्रामाणिक कला-साधनेपेक्षा, आपले
महत्त्व प्रस्थापित करणे, प्रेक्षकांना तुच्छ लेखणे, अध्यापन सचोटीने न करणे, कार्यक्रमाच्या
वेळा, तांत्रिक बाजू न सांभाळणे, अशा दोषांना तो कलेच्या पांघरूणाखाली लपवायला पाहतो.
मात्र, आजच्या ज्येष्ठ कलाकारांनी या दोषांना लांब ठेवल्यामुळेच कलेचे शिखर गाठले आहे.
असं म्हणतात की गती ही निश्चित आहे, तुम्ही पुढे
जात नसाल तर तुम्ही मागे राहता. कलावंताचा प्रवास, गुण जोपासण्यामुळे आणि दोष
टाळल्यामुळेच शिखराच्या दिशेने होईल, अन्यथा काही न करताही तोच प्रवास गर्तेच्या
दिशेने असेल.
Wednesday, April 1, 2020
रास आणि कथक:
कृष्णरूप साकारताना रासधारी |
भारतीय कला परंपरेत अनेक कला प्रकार कृष्णचरित्रावर जोपासले
आहेत. प्राचीन भारतीय नाट्यकलाही त्यांपैकीच एक. रास किंवा रासलीलाही असाच लोक-नाट्याचा
एक प्रकार जो कृष्ण-कीर्तनातून निर्माण झाला आणि कृष्णभक्तीमुळे बहरला. आज रास किंवा
रासलीला या सामान्य नावाचा कलाप्रकार सौराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत आणि थेट दक्षिणेत
तामिळनाडूपर्यंत अनेक राज्यांत वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रचलित झालेला दिसतो, अर्थात
या सर्व प्रकारांमध्ये कृष्ण-कथा-कीर्तनाचा अंतरात्मा समान आहे. मात्र आज या लेखात
वृंदावनात जन्मलेल्या आणि बहरलेल्या “ब्रज की रासलीला” या नाट्य-प्रकाराचा विचार कथकच्या
संबंधाने करणार आहोत.
रास: प्राचीनता
रास याची व्याख्या शास्त्रकारांनी ’रसांना समूहो
रास:’ अर्थात, विविध रसांचे मिश्रण असलेले सादरीकरण अशी केली आहे. रास हा शब्द
संस्कृत नव्हे तर रास शब्द आणि रास नृत्य दोन्ही मूळात देसी आहेत. रास याच नावाचा
एक देसी ताल तसेच एक देसी काव्यछंद आहे. (तेत्तिगिध इति शब्देन नर्तनं रासतालतः।- भरतकोश). रास या नृत्यप्रकाराचा उल्लेख नाट्यशास्त्रापासून सापडतो. मुख्य दहा
नाट्यभेद म्हणजेच दशरूपके सांगितल्यावर भरताने अनेक उपरूपके सांगितली आहेत. ही
उपरूपके म्हणजे लहान नाट्यप्रकार ज्यात नृत्य आणि नाट्याचं मिश्रण असेल. रास किंवा
रासक याचा उल्लेख असे एक उपरूपक म्हणून येतो. भरतोत्तर काळात, याचे नृत्यरासक
(नृत्यावर अधिक भर) आणि नाट्यरासक (नाट्यावर अधिक भर) असे उप-प्रकारही केलेले
दिसतात. आजच्या रासलीलेमध्ये या दोन्ही प्रकारांचे उत्तम मिश्रण दिसून येते.
हल्लीसक हे उपरूपकही रासनृत्याशी साधर्म्य असलेले आहे.
भागवतातील रासलीलेच्या उगमाची कथा:
श्रीमद्भागवतपुराणात
वृंदावनातील रासलीलेच्या उगमाची कथा सांगितली आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री
श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर गोपींना रासक्रीडेसाठी आमंत्रित केले. मात्र
रासक्रीडा रंगात आली असतानाच, कृष्ण अदृश्य झाला, त्याच्या विरहात व्याकूळ
झालेल्या गोपी त्याच्या सहवासातील सुंदर क्षण आठवू लागल्या. श्रीकृष्णलीला आठवून,
त्यांचे नाट्यमय रूप सादर करून त्याद्वारे त्या कृष्णालाच अनुभवू लागल्या. इथूनच
कृष्ण-कथा नाट्यातून रासलीलेची सुरुवात झाली. या पौराणिक कथेतून रासलीलेच्या
परिवर्तनाविषयी निष्कर्ष काढता येईल. कथेनुसार रासलीलेचे दोन भाग आहेत, पहिला भाग
कृष्णाने स्वतः सुरू केलेला, म्हणजेच हे रासलीलेचे प्राचीन रूप. तसेच दुसरा भाग,
गोपींनी म्हणजेच भक्तांनी निर्माण केलेला. आजच्या रासलीलेत असे दोन भाग स्पष्ट
दिसतात. पहिला नित्य रास (कदाचित नृत्य चे अपभ्रंशित रूप) जे प्राचीन रूप आहे आणि
दुसरा लीला-भाग जो, रासलीलेच्या पुनरूज्जीवनाच्या काळात त्यात नव्याने घातला गेला.
रास:
ऱ्हास आणि कथकच्या छायेत पुनरुज्जीवन
इस्लामी राजवटींच्या काळात, रास किंवा रासक नृत्याचा
ऱ्हास झाला. भक्तिपूर्ण अशा प्रकारात प्रेक्षकांच्या अभिरुचीप्रमाणे, शृंगार आला,
चमत्कृती आली, आणि रासचे मूळ रूप लोप पावत चालले. असे म्हणतात की नवाब वाजिद अली
शहांनी रास नृत्याला अनुसरूनच नृत्यनाट्याची निर्मिती केली ज्याचे नाव त्यांनी रहस
ठेवले. रहस हे रासचेच शृंगारप्रधान रूप होते.
आज जी रासलीला प्रचलित आहे, तिचे पुनरुज्जीवन 15 व्या
शतकात वृंदावनात झाले. याच काळात उत्तर भारतात भक्ती संप्रदायाची लाट आली होती आणि
प्रत्येक कलाप्रकार भक्तिरंगात न्हाऊन निघत होता. याच काळात ब्रज रासलीलेला वैष्णव
आचार्यांनी नव संजीवनी दिली. वल्लभाचार्य, स्वामी हरिदास, हितहरिवंशी, घमंडाचार्य,
श्री नारायण भट्ट अशा अनेक आचार्यांची नावे घेता येतील. रासलीला या काळात नवीन
रूपात बहरली. याच काळात उदयाला आलेल्या अष्टछाप कवींच्या काव्यामुळे रासलीलेतही
समृद्ध साहित्याची भर पडली. आता रासलीला हे केवळ लोकनाट्य न राहता, सकस साहित्याने
समृद्ध, सुंदर नृत्याने युक्त, अनेक गीतीप्रकारांनी सजलेला असा एक प्रगल्भ नृत्य-नाट्यप्रकार
बनला होता. ध्रुपद शैलीतील संगीताचा वापर तर यात आधीपासून होताच त्यात आता ब्रजसाहित्यातील
अनेक पदे, सवैय्या, विष्णुपदे, कवित्त, छंद यांची भर पडली. आचार्यांनी रासलीलेतील
नृत्यास अधिक सुसंस्कृत बनविण्यासाठी तत्कालीन मंदिर व दरबारांमधील नृत्य-गुरूंना आमंत्रित
केले. हे नृत्यगुरू उत्तर भारतात कथकचे किंवा नेमके सांगायचे तर कथकच्या पूर्व अशा
शैलीचे प्रचालन व प्रशिक्षण करत असणार. या नृत्याचार्यांनी रासधारींना नृत्याचे शिक्षण
तर दिलेच पण एकूणच रासलीलेतील नृत्य-भागाचे पुनरुत्थान केले. याचे प्रतिबिंब गोचरण-लीलेत
दिसून येते, जेव्हा तोष नावाचा गोप कृष्णाला नृत्याचे प्रशिक्षण देतो तेव्हा कथकच्या
प्रचलित आरंभीच्या बोलापासून, तत् तत् थुं थुं पासून सुरुवात करतो.
रासलीलेतील नृत्य भागाचे श्रेय श्रीवल्लभ यांना दिले
जाते. हे वल्लभ स्वतः नृत्याचार्य असून राजस्थान दरबारात होते. कथकमध्येही वल्लभ
हे नाव येते, अनेक कवित्तांच्या रचना यांच्या नावाने, नटुआ-वल्लभ या नावाने आहेत.
रास लीलेत पूर्वीपासून प्रचलित असलेले अनेक परमेलू किंव परमूल (बहुतेक ठिकाणी
परमूल हा शब्द वापरला आहे) आजही कथकच्या जयपूर घराण्यात प्रसिद्ध आहेत. रासचा
मूळातला उल्लेख हा नृत्त म्हणून आहे किंवा काहीवेळा नृत्य म्हणून आहे. रासलीलेचे
पुनरुज्जीवन झाले तेव्हा नव्या रूपात, मूळच्या नृत्यानंतर नाट्याचाही भाग जोडला
गेला. आज रासलीलेच्या सादरीकरणात सुरूवातीला जुन्या पद्धतीप्रमाणॆ नृत्य असते आणि
मध्यंतरानंतर रासमंडळी एखाद्या कृष्णलीलेचे नाट्य सादर करतात. रासमंडळींसह या
नव्या रूपाच्या बांधणीत जे कथाकार सहभागी झाले होते, त्यांचा हा नाट्यभाग रासलीलेत
नव्याने सुरू करण्यात नक्कीच मोठा हातभार लागला असणार. कथकारांकडे कथा-कीर्तनाची
परंपरा होतीच, मात्र दरबारात आवडेल असे नृत्य करताना कथकारांचे प्राचीन नाट्यमय कथाकथनाचे
रूप मागे पडले होते. ते हरवलेले नाट्यरूप रासलीलेत कथकारांनी शोधायचा प्रयत्न केला
असणार.
अशा प्रकारे, कथकारांनी रासलीलेतील नृत्याचे लालित्य
तर वाढवलेच पण त्याचबरोबर आपली हरवत चाललेली कथाकीर्तनाची परंपरा रासलीलेत नव्याने
रोवण्याचा प्रयत्न केला.
रासलीला – सादरीकरणाचे स्वरूप
रासलीलेची सुरुवात मंगलाने होते. रासमंडलीचा स्वामी मंगलाचरणाचे
गायन करतो. त्यानंतर बाकी मंडलीतील गायकही वातावरण निर्मितीसाठी वेगवेगळी पदे
गातात. मंगलात यानंतर मध्यभागी बसलेल्या राधाकृष्णांची आरती केली जाते. यानंतर
सर्वांच्या विनंतीनंतर राध आणि कृष्ण गोपीमंडलात येतात रासलीलेचा नृत्त भाग सुरू
होतो. यात कृष्ण, राधा आणि इतर गोपी एकल रूपात विविध परमूलांचे सादरीकरण करतात. या
परमूलांचे बोल आणि कथकचे बोल यांत खूप साधर्म्य
आहे. श्रीराधाकृष्णलीला प्रसंगातील हा परमूल पहा:
ता तिधा थेई थेई ताथेई - ता तिधा थेई थेई ताथेई
ता तिधा थेइयता - ता तिधा थेइयता
थेई ऽ ऽ ऽ त त त ता, थेई ऽ ऽ ऽ त त त ता
या परमूलाला कथकचा तुकडा म्हणता येईल, इतके बोलसाधर्म्य
आहे. अनेक परमूल किंवा परमेलू असे आहेत, की जे कथकमधील परमेलूच्या व्याख्येत बसतात.
जसे हा परमेलू:
तकिट तकिट धिलांग धिक तक तो दीम ताम
तकिट तकिट धिलांग धिक तक तो दीम ताम
ता तू त्रंग थुन थुन तो, धिक तू त्रंग, थुन थुन तो
ता तूंग तूंग धिक तूंग तूंग धिकतक
थुंग थुंग तक थुंग थुंग तक, थोंग तक थोंग तक ददिगिन
थेई
तततता थेई तततता थेई तततता थेई
इथे रासमधील नृत्ताचा भाग संपतो, काही वेळा याच भागात,
मयूर नृत्य (पिसारा घेऊन गुडघ्यांवर फ़िरून केलेले नृत्य), दंड रासक (टिपऱ्या घेउन)
असे रंजक प्रकारही केले जातात.
या नृत्त भागानंतर, एक मध्यंतर येते, त्यातही भक्तियुक्त
पदांचे गायन केले जाते. या मध्यंतरानंतर कृष्णलीलेचा भाग सुरू होतो. या भागात मंडली
नृत्य, गायन, नाट्यातून एखादा कृष्णलीलेचे नाट्यमय सादरीकरण करतात. रासलीलेत सादर
केले जाणारे कृष्णलीलेचे प्रसंग बहुतेकदा पुराणांमधले असतात, त्याचबरोबर पुराणांमधील
प्रसिद्ध कथांचे लोकसाहित्यातले वेगळे रूपही पहायला मिळते तर कधी पूर्णपणे नवीन कथाही
सादर केल्या जातात, जसे राधा व कृष्णाचा वाङ्निश्चय.
रास आणि कथक:
रास आणि कथक कृष्णकीर्तनातून निर्माण झालेल्या या दोन्ही
नृत्य प्रकारांमध्ये अनेक साधर्म्ये आहेत. चारी, मंडले, हस्तक याबाबतीत तर काही
प्रमाणात साधर्म्य दिसतेच. तसेच अनेक पारिभाषिक शब्द जसे, सुढंग, लाँग-डाँट,
उरप-तिरप हे रासमध्येही प्रचलित आहेत, अनेक परमूलांमध्ये ते वापरले जातात तसेच
त्यांचे अर्थही जवळपास सारखे आहेत. हरिव्यासदेवाचार्यांचा हा छंद पहा:
सुढंग हस्तक : स्रोत: रासलीला तथा रासानुकरण विकास |
रासमंडल मधि निर्तत मोहनी मोहन, वृंदावन नवनिकुंज
सुंदर आनंदघन।
लाग दाट उरप तिरप उघटत संगीत सुलप, राग रंग तान मान
गान सुघर सप्त सुरन॥
अंगसाधर्म्यही काही प्रमाणात आहे. त्रान हा बोल उडी मारून
करणे, सुढंगचे थाटसारखे अंग इ.
रास आणि कथकमध्ये परस्पर-देवाणघेवाण असलेले नाते आहे
असे म्हणता येईल. रासच्या प्राचीन रूपातील परमेलू, तुकडे पुढे इतके प्रसिद्ध झाले
की स्वतंत्र रचना म्हणून केले जाऊ लागले, कथकमध्ये हे परमेलू केले जाऊ लागले. याउलट,
रासच्या पुनरुत्थानात कथक आचार्यांनी हातभार लावला आणि रासलीलेतील नृत्य भागास
लालित्यपूर्ण बनवले. तत्कालीन राजाश्रयाला असलेल्या कथकारांना दरबारात आवडेल असे
सादरीकरण करताना आपल्या कथाकीर्तन रूपाला मागे ठेवावे लागत असे आणि चमत्कृतीवरच भर
द्यावा लागत असे. त्यांनी मग लोप पावत चाललेली आपली कृष्णनाट्याची परंपरा जणू
नव्याने रासलीलेत शोधली.
रास आणि कथक शतकानुशतकांचे अनेक चढ उतार पाहिलेल्या
नृत्यशैली. दोन्ही शैलींमध्ये त्या त्या काळात, कधी नृत्यावर जास्त भर होता, तर कधी
नाट्यावर. दोन्ही शैली एकमेकींना समांतर वाटचाल करत राहिल्या, एक लोकाश्रयाने,
लोकनाट्यमंचावर तर दुसरी राजाश्रयाने दरबार व मंदिरांमध्ये. तरी या वाटचालीत
दोन्ही शैलींचे एकमेकींवर प्रभाव झाले, आदान-प्रदान झाले. मात्र एकीच्या आपत्काळात
दुसरीने तिला सावरले, ते आपल्याकडची अशी नाट्यपरंपरेची संपत्ती देऊन, ज्या संपत्तीला
तिच्या दरबारी रूपात आता किंमत उरली नव्हती.
Subscribe to:
Posts (Atom)